पु. लं. एक आनंदयात्रा

ABOUT THE PLAY

नमस्कार 'पुल'कितहो, पु. ल. नी लाखा-लाखांनी देणग्या दिल्या आहेत.  एक ‘मुक्तांगण’साठी दिलेली देणगी आणि दुसरी फर्गसन कॉलेजच्या साहित्य सहकारच्या आठवणीत माधव आचवलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘किमया’साठी दिलेली देणगी! म्हणजे कलात्मक निर्मितीच. तुम्ही त्याच्याविषयी थोडं सांगा असं त्यांना विचारला असता ते म्हणाले... याच्याविषयी बोलायला मला फार संकोच वाटतो. त्याच्यामागचा खरा हेतू काय, तो सांगतो तुम्हाला. समाज गंभीरपणे कुठल्या तरी कार्याला लागला आहे, हे दृश्य माझ्या डोळ्यांपुढे येऊच शकत नाही. माझ्या डोळ्यांपुढे रांगेत जाणारी माणसं येत नाहीत. माझ्या डोळ्यांपुढे येतात ती जत्रेत हिंडणारी माणसं, आनंदात असणारी माणसं! ती माझी सुंदर समाज पाहण्याची कल्पना आहे आणि म्हणून मला नेहमी वाटतं की, शंभर मुलं हसताना बघायला मिळाली पाहिजेत. चार तरुण जमलेले असतील तर त्यातल्या एकानं काही चित्रं काढलेलं असावं. बाकीचे तरुण ते पाहत असावेत. एक तरुण गात असला तर बाकीच्या तरुणांनी त्याचं गाणं ऐकावं. कविता वाचत असताना एक तरुण आणि एक तरुणी यांनी एकत्रितपणे जोरजोरात हसावं; हे  वातावरण पाहिजे. ‘मुक्तांगण’मध्ये ते वातावरण व्हावं म्हणून मी तिकडे पैसे दिले. बाबा आमटय़ांच्या इथे जे अंध-अपंग आहेत, त्यांना तिथे आनंदाचा प्रत्यय यावा म्हणून तिथे पैसे दिले. ‘किमया’च्या मागेसुद्धा माझी हीच कल्पना आहे की, मुलांनी इकडे जा, तिकडे हिंड असं करण्यापेक्षा त्यांना एकत्र बसण्याकरिता जागा करून देऊ
त्यांच्या ह्या चांगुलपणाच्या अभिव्यक्तीला दाद म्हणून आणि त्यांच्या दानयज्ञाला मानवंदना म्हणून अक्षयपात्र या लहान मुलांसाठी 'मिड डे मील' हा उपक्रम राबविणाऱ्या संस्थेच्या मदती करिता दोन दिवसाचा आनंद सोहळा म्हणजे आनंदयात्रा आयोजित केला आहे.

MORE INFO